ऋतू
POEMSमराठी MAY 2024
5/31/20241 min read
भिजलेली रान पाखरे, भिजलेल्या साखर मिठीत,
हळुवार जपतात प्रेमाची ओली सांज वेळ,
येणार्या सुखाला शीळ घालत,
रंगवतात भातुकलीचा खेळ.
सरतात स्पर्श नवखे, मिसळतात ऋतू एकमेकात,
जाईचे सुगंध वेडे, वीरतात फोडणीच्या वासात,
मखमालि पलंगावरचे क्षण, सरतात एका क्षणात,
आणि विरलेल्या स्वप्नांचे ओझे, विसावतात दोन डोळ्यात.
कवयित्री - स्नेहा वैद्य