वीर सावरकर आणि आजची युवा पिढी
वीर सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि The Leading Phase' सादर करीत आहे, (सदर लेख २८ मे २०२१ च्या तरुण भारत या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे)
मराठी HISTORYVEER SAVARKAR
Apoorv Kulkarni
1 min read
इतिहास म्हणजे भूतकाळ, परंतु माणसाला कायमच ओढ असते ती भविष्यकाळाची पुढे काय होईल याची. भूतकाळ हा कायमच विसरून जाण्यासाठी असतो आणि आपल्याकडे म्हणतात देखील की, झाल्या-गेल्या गोष्टी विसरून पुढील कामाला लागावे.’
परंतु भूतकाळ आणि भविष्यकाळ या परस्पर विरुद्ध गोष्टी असताना आपण इतिहास का शिकवा? पण जसे की, Quantum Physics मध्ये म्हणतात opposites are complementary. अर्थात परस्पर विरुद्ध गोष्टी या परस्परपूरक देखील असतात. तेव्हा भविष्य आणि भूतकाळ हे दोन्ही वर-वर दिसायला जरी परस्परविरोधी असले तरी मूलतः ते परस्पर पूरकच आहेत. कारण इतिहास हा भविष्याचा आरसा असतो प्रत्येक माणूस आपले भविष्य आपल्या इतिहास पाहून ठरवू शकतो किंवा शोधू शकतो म्हणूनच म्हणतात History Repeats Itself आणि अर्थात जो समाज इतिहासाला डावलतो तो अत्यंत कमकुवत बनत जातो. कारण,
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः (भगवदगीता २.२१)
अर्थात
श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्यजन करतात.
तेव्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या इतिहासातील एका व्यक्तीकडून आजच्या तरुण पिढीला शिकण्यासारखे खूप काही आहे. सावरकर हे एक देशभक्त म्हणून थोर आहेतच परंतु, त्याचबरोबर सावरकर हे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वचे एक मूर्तिमंत उदाहरण आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बुद्धीची स्थिरता आणि निर्णय घेण्याची क्षमता कशी असावी ज्याला इंग्रजीमध्ये आपण decision making capacity under pressure असे म्हणतो, एखाद्या कामासाठी असलेले झपाटलेपण, त्यासाठी करत असलेला किंवा करू इच्छित असलेला त्याग, त्यासाठी दाखवलेले धैर्य अशा एक ना अनेक गोष्टी आजची तरुण पिढी किंबहुना प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यवीरांकडून शिकू शकते.
सावरकरांची मार्सेलिसची उडी सर्वांनाच माहित असते, परंतु ती उडी ही काही कोणते अविचारीपणाने केलेले धाडस नव्हते. तर ते कितीही बिकट परिस्थिती असेल तरी त्यामध्ये आपली बुद्धी स्थिर ठेवून योग्य तो निर्णय वेळ न दवडता घेणे याचे उत्तम उदाहरण आहे. यामागे चालू जगाच्या राजकारणाचे असलेल्या ज्ञान होते फ्रान्स आणि ब्रिटन या दोन्ही देशांमध्ये कैदी हस्तांतरण करण्याचा कोणताही करार नव्हता. म्हणून अभ्यासाअंती केलेले ते एक धाडस होते.
एखाद्या सामान्य मनुष्याला पन्नास वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली तर तो तिथेच खचून जातो किंवा हताश होतो, जगण्याची जिद्द, इच्छा सर्व काही संपून जाते. परंतु याउलट सावरकरांनी काय केले तर, सेल्युलर जेलमध्ये होणारा लोकांचा अमानुष छळ आणि माणुसकीच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत हीन वागणुकीच्या विरोधात आंदोलन केले आणि ते इतके मोठे की, त्यांच्याशी चर्चा करायला खास त्यावेळचे भारताचे गृहमंत्री क्रॉडॉक यांना सावरकरांशी चर्चा करायला अंदमानला यावे लागले.
त्याबरोबरच सावरकरांनी अंदमानमध्ये प्रौढ साक्षरता वर्ग, २००० पुस्तकांचे ग्रंथालय, इतिहासाचे पाठ असे विविध सामाजिक कार्यक्रम देखील हाती घेतले. यामध्ये आजच्या युवा पिढीला हे झपाटलेपण, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणे हे सावरकरांन कडून शिकायला हवे. सावकारांकडून अजून काही शिकायचं, तर आपण धैर्य शिकू शकतो. आपला लहान मुलाचे झालेले निधन, दोन्ही बंधूंना झालेली अटक, हिंदुस्थान मध्ये घरी असलेली भयानक परिस्थिती, अशातही सावरकर न खचता अधिक जोमाने लंडन मधून क्रांतिकार्य चालवत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अजून एक अत्यंत महत्वाचा गुण जो आजच्या काळात तर खूपच गरजेचं आहे तो म्हणजे Multitasking. परंतु, एकाच वेळेस अनेक क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कार्य कसे करावे? (How to multitask successfully when mastering each one of them?)
कारण सावरकरांनी देशसेवा केली आणि ते स्वातंत्र्यवीर झाले. त्यांनी समाजसेवा केली त्यातही उत्तम कामगिरी बजावली, त्यांनी साहित्यनिर्मिती केली तर त्यातही उच्च शिखर गाठून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले. भाषा शास्त्रावर काम केले आणि मराठी भाषेला एक वेगळाच दृष्टीकोन दिला.
तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकाच वेळेस अनेक विविध आघाड्यांवर काम करून त्या प्रत्येक आघाडीत उत्तम आणि प्रतिभावंत असे काम करून दाखवले हा टाईम मॅनेजमेंट आणि multitasking चा त्यांचा गुण आजच्या पिढीने घेण्याची खरेच खूप गरज आहे.
- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी