पाऊस पुन्हासा
POEMSमराठी JUNE 2024
7/3/20241 min read


आज सकाळ सावळी
घन दाटूनिया आले
उन्हे सरली बाजूस
काय, संकेत धाडले ?
अन पावसाची रिमझिम
पान पान शहारले
शुभ्र धारा लपेटून
वस्त्र सृष्टीचे सजले
आले विसाव्याचे क्षण
मन-मळभ हाटले
आली आनंद चाहूल
मन श्रावणी पोचले
अगा, नित्य नैमित्तीक
जरी निसर्गाचा तोच खेळ
तरी मन आनंदते
घडे मोद - सुख मेळ
- मधुरा ताम्हनकर