पुन्हा एकदा
मराठी POEMSJUNE 2024
7/3/20241 min read


सूर्योदयाच्या किरमिजी किरणांनी मला मिठी मारली ।
त्यांनी माझे मनापासून चुंबन घेतले,
लाजेच्या पदराने माझे हळवे मन पांघरले,
सुगंधित वा-याच्या झुळुकेने हळुवार माझे अंग मोहरले ।।
जणू काही मला अचानक जाग आली ।
प्रेमाच्या महासागरात आकंठ बुडायला मी सज्ज झाले,
युगानुयुगे मी स्वतःला शोधत होते,
आणि आज पुन्हा एकदा मी प्रेमात पडले.
पण यावेळी, स्वतःच्याच... ।।
-Manisha Keshab