नको
POEMSमराठी MAY 2024
5/31/20241 min read


नको सांजवेळी
अशी दर्द गाणी
राहो तळाशी
काही लपलेले
नको वेणू कानी
नको आस आता
श्वास हे दवाचे
उन्हे पोळलेले
नको तो बहावा
उभा अंगणात
लोलक सुखाचे
आता मिटलेले
नको पौर्णिमेचा
चंद्र तो नभाला
आता आवसेचा
छंद लागलाहे
आता ज्योत एक
निरांजनाची पुरेशी
वितळून सारे
मी ती एक होत आहे
नको सांजवेळी
अशी दर्द गाणी..
- मधुरा ताम्हनकर