एकाकी

POEMSमराठी MAY 2024

5/31/20241 min read

रात्र काळी, घरात सुनेपण,

भिंतींच्या आडून झिरपते,

शांत एकटे भकास किर्र्पण

नात्यांच्या हिंदोळ्यावर,

घेता झोका उंच अचानक,

वरुन धप्पकन तोल जाऊनी,

भंगून जाते स्वप्न भयानक

का विणता विणता छान मखमली,

एकच धागा तुटून जातो,

अन मन कावरे बावरे,

फाटक्याला झाकून घेतो

पंख्याची ती गंभीर घरघर,

कुणाचीच चाहूल नसते,

आपणच असतो आपल्या साठी,

नशिब भाबडे हासत बसते

तो जातो.... कधीच गेलेला असतो,

आपणच व्यर्थ मागे उरतो,

पाऊल खुणांवर हात फिरवूनी,

पावलांची वाट पाहत बसतो

नसलेल्या गोष्टींची ईर्षा,

का बरं सोडत नाही,

अंधारलेल्या घरात एकट्याने,

का लामणदिवा मालवत नाही

कवयित्री - स्नेहा वैद्य