मोहना
POEMSमराठी JULY 2024
8/7/20241 min read


दुडूदूडू दुडूदुडू ये मोहना
आनंदू पसरू दे सदना || धृ ||
छुनूछुनू पैंजण वाजवीत ये
हळूहळू पाऊल टाकीत ये
उल्हास नांदो रे अंगणा |
दुडूदुडू दुडूदुडू ये मोहना
आनंदू पसरू दे सदना ..
खट्याळ डोळे मिचकावीत ये
खळ्याखळयातून हासत ये
किती लडीवाळसा तू नंदना |
दुडूदुडू दुडूदुडू ये मोहना
आनंदू पसरू दे सदना ...
मोरपिसापरी तव कोमल काया
स्वर सानिकेचा तू गळ्यातच ल्याला
मन हे लागले तव भजना |
दुदुदुडू दुडूदुडू ये मोहना
आनंदू पसरू दे सदना ..
होऊनी यशोदा आम्ही घालितो साद
घराघरांत नांदो पैंजण नाद
किती आतुरलो तव दर्शना |
दुदुदुडू दुडूदुडू रे मोहना
आनंदू पसरू दे सदना ..
आनंदू पसरू दे सदना ..
- सौ. मधुरा महेश ताम्हनकर