गुरु पूर्णिमा निमित् कविता
SPIRITUALJULY 2024
8/7/20241 min read


कृष्ण हेच जगद्गुरु
कृष्ण माझे सद्गुरु
कृष्ण माझे धर्मगुरू
कृष्ण माझे कर्मगुरु
कृष्ण माझी माता
कृष्ण माझा पिता
कृष्ण माझा दाता
कृष्ण हीच भगवद्गीता
कृष्ण माझा अत्रतत्र सर्वत्र
कृष्ण हेच तीर्थक्षेत्र
कृष्ण माझे धर्म क्षेत्र
कृष्ण हेच जीवनसूत्र
कृष्ण माझे ध्यान
कृष्ण माझे मन
कृष्ण माझे चिंतन
कृष्ण माझे मनन
कृष्ण माझा सखा
कृष्ण हाच आत्मा
कृष्ण हाच परमात्मा
कृष्ण हाच जगत पिता
माझ्यासाठी कृष्ण हाच माझा गुरु
श्रीमती आशा चंद्रकांत कुमणे, सोलापूर