आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा

JULY 2024SPIRITUAL

8/7/20241 min read

श्रीकृष्ण भगवान म्हणजेच विठ्ठल रूप..रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्णाची  दिन्डर वनात आले. कारण आपले प्रेम कमी पडते का?? त्यासाठी रुक्मिणीने दिंडरवन येथे तपश्चर्या सुरू केली. श्रीकृष्ण शोधत दिंडर वन येथे आले. परंतु त्यांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली व ते भक्त पुंडलिकास भेटावयास गेले. भक्त पुंडलिक आई - वडिलांची सेवा करत असता श्रीकृष्ण यास पाहून उभे राहण्यासाठी भक्त पुंडलिकाने वीट दारात फेकली. तिथेच श्रीकृष्ण उभे राहिले हेच ते पंढरपूर युगाने युगे विटेवरी करकटावरी ठेवोनिया उभा ठाकला....

विठ्ठल, विठोबा,पंढरीनाथ

 अशा विविध नावाने भक्तांना भेटीची ओढ लावणारा श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल.

आठशे हून अधिक वर्षाची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठल पंत पंढरपूर वारीची प्रथा सुरू केली.

सामुदायिक सांस्कृतिक धार्मिक परंपरेची प्रथा श्री ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून संत तुकाराम देहूहून शेगावहून गजानन महाराज यांच्या पालख्या आषाढी एकादशीला दरवर्षी पंढरपूर येथे येऊ लागल्या. प्रत्येक खेडेगावातून तालुक्यातून जमा झालेले लोक म्हणजेच दिंडी...विठ्ठल नामाचा गजर करत ऊन-पाऊस याची पर्वा न करता..पायी चालत पालखी वारीला वारकरी जमतात व आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचतात. जो नियमित वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. वारकरी धर्म पाळतो त्यालाही वारकरीच म्हणतात. अतिशय उत्साहाने टाळ मृदंग भजन कीर्तन करत बेभान होऊन भक्ती भावात तल्लीन होतात व पंढरपूर येथे पोहोचतात. चंद्रभागे स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन स्वस्थानी परततात.

अशा विठ्ठलाची ओढ सर्वसामान्य भक्त जणांना व जे देवाला मानतात अशा भावपूर्ण श्रद्धा व भक्ती यामुळे लाखो भक्तजन पंढरपूरला दिंडीत सामील होतात अशा या वारकरी जनास नमन .!!

श्रीमती आशा चंद्रकांत कुुमणे