प्रेमाच्या वस्तीला

POEMSमराठी

Dr Chitra Milind Goswami

7/11/20241 min read

प्रेमाच्या वस्तीला स्वतंत्र कसे करणार

जे आठवात नाहीत ते कसे आठवणार।

या सिमेंटच्या जंगलात दगडाचीच हृदये

या दगडांकडे आता न्याय कसा मागणार।

ते परतलेच नाहीत जे म्हणाले परतेन

त्यांच्यासाठी जीवन बरबाद कसे करणार।

राम आणि रहीम त्याच ईश्वराची रूपे

धर्माच्या नावावर दंगा कसा करणार।

वेदनाच तर सांभाळत आली आजवर

वेदनांना आता दूर कसे करणार।

- डॉ चित्रा मिलिंद गोस्वामी

Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:
LinkedIn | Instagram | Facebook