हे जीवना तुझा लोभ

मराठी POEMS

Dr chitra milind goswami

7/11/20241 min read

हे जीवना तुझा लोभ नाहीच मला

तू दिल्यास दुःख- वेदना भरून मला।

कोणीच नसतात सोबती शेवटाला

रस्त्यांनीही आज फसवले मला।

जख्मा अजूनही ताज्या तशाच त्या

घावांनीही दिले जगण्याचे उपदेश मला।

होतीच कुठे सहज शांततेची यात्रा

पायांनीही वाटेवर अडसर केला मला।

दगडांमध्येच जरी घालवायचे जीवन

ठेचकाळण्याची नाही वाटत भीती मला।

वाचा कधीतरी माझ्या प्रेमाची कहाणी

प्रेमानेच टाकलंय संपवून कसे मला।

- डॉ.चित्रा मिलिंद गोस्वामी

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook